Posts

शिव शिवाई देवस्थान

Image
|| ॐ नमः शिवाय || शिव शिवाई देवस्थान हे  मौजे कोरफळे, तालुका बार्शी- जिल्हा सोलापूर येथे असून या मंदिराची स्थापना  दिनांक २७/१०/२०१६ रोजी  आनंदमय वातावरणात झाली. येथे गोशाळा, अन्नछत्र व भक्तनिवास करण्याचे योजिले आहे शिवाई देवीचे मूळ मंदिर सुर्डी येथे आहे . याच मंदिराचे एक ठिकाण सोलापूर येथे असून यास श्री. हरिश्चंद्र चौगुले (काका) यांनी नावारूपास आणण्याचा एक छोटासा प्रयत्न कोरफळे येथे केला. हे जागृत देवस्थान असून येथे शिवाई देवीचे दगडी बांधकामातले हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर बांधले आहे.  तसेच येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे . याचे नाव स्वयं शिवसिद्ध गणेश असे संबोधण्यात येते व शिवलिंग नागनाथ मूर्तीची स्थापना देखील येथे करण्यात आले आहे. तसेच श्री. हरिश्चंद्र चौगुले (काका) यांची समाधी स्थळ देखील या ठिकाणी आहे.  देवस्थान कडून वर्षातून वेगवेगळे  उत्सवाचे आयोजन करणात येते.